Home राजधानी मुंबई राज्यपालांच्या हस्ते डॉ. आंबेडकर पुरस्कार प्रदान

राज्यपालांच्या हस्ते डॉ. आंबेडकर पुरस्कार प्रदान

62

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज राजभवन येथे 10 वे भारतरत्न डॉ. आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आले.
अभिनेते सुनिल शेट्टी, पार्श्वगायक सोनू निगम, अभिनेत्री रिचा चड्डा आणि झरा खान, आमदार डॉ. भारती लव्हेकर यांच्यासह दहा व्यक्ती व संस्थांना कोरोना काळातील समाजकार्यासंदर्भात पुरस्कार प्रदान करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य अतिशय प्रेरणादायी असून त्यांचे विचार भावी पिढ्यांनादेखील नेहमीच मार्गदर्शन करीत राहतील, असे उद्गार राज्यपालांनी काढले.
संसदीय राजकारणात हार-जीत होत असते; परंतु समाजसेवेत नेहमी लोकांचे प्रेम मिळते. निस्वार्थ सेवेचा आनंद अवर्णनीय आहे. त्यामुळे सर्वांनी जीवनातील थोडा वेळ तरी समाजकायार्साठी दिला पहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.
कोरोना काळात सामान्य लोकांना मदत केल्याबददल राज्यपालांच्या हस्ते इस्कॉन मंदिर, जुहू, सेंट पिटर्स चर्च, आययूव्ही फाउंडेशन, तसेच युवा संगीतकार तनिष्क बागची, साईबाबा हॉस्पिटलचे डॉ. एऩ ए. हेगडे, व्यवसायी मेहूल मेहता, समाजसेवक अब्दुल रहेमान वानू यांसह निवडक व्यक्तींना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
बुद्ध क्रिएशन आॅफ इंडियन सिनेमा या संस्थेने पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. संस्थेचे अध्यक्ष कैलास मासूम व आश्रयदाते कृष्णा पिंपळे यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अभिनेते अमन वर्मा यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here