Home राज-पाट जो बायडन अमेरिकेचे 46 वे अध्यक्ष

जो बायडन अमेरिकेचे 46 वे अध्यक्ष

108

युनाटेड स्टेट आॅफ अमेरिका : अमेरिका राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा निकाल जवळपास जाहीर झाला असून डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन यांनी विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला. जो बायडेन ( president of america ) यांना अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जाहीर करण्यात आले आहे.
पेनसिल्वेनियामधील मतमोजणी अखेर संपताच जो बायडेन यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. ते अमेरिकेचे 46 वे अध्यक्ष होणार आहेत. बायडन यांनी वेस्ट वर्जीनिया, वॉशिंगटन कॅलिफोर्निया, कोलोराडो, न्यू हॅम्पशायर, डिस्ट्रिक्ट आॅफ कोलंबिया, न्यू यॉर्क, न्यू मॅक्सिको, वर्मोंट, कनेक्टिकट, डेलावेयर, इलिनोइस, मैरीलँड, मैसाचुसेट्स, न्यू जर्सी, टेनेसी ओरेगन, विस्कॉन्सिन, रोड आयलँड, वरमोंट, हवाई, मिशिगन, मिनेसोटा आणि रोड आयलँडमध्ये विजय मिळवला आहे. जो बायडन हे अमेरिका-भारत संबंधांचे खंदे समर्थक आहेत.
राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात बायडन यांनी उप राष्ट्राध्यक्ष म्हणून आठ वर्षे काम केले आहे. ओबामांसोबत बायडन यांनी भारतीय नेतृत्त्वासोबत चांगले संबंध जोपासले आहेत. शिवाय त्यांचे भारतीय अमेरिकन नागरिकांसोबतही जिव्हाळ्याचे संबंध आहेत.

उपराष्ट्राध्यक्षपदी कमला हॅरिस
भारतीय वंशाच्या कमला हॅरिस या उपराष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणार आहेत. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदापर्यंत पोहोचणाºया त्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला नेत्या आहेत. शिवाय अमेरिकेतील मोठ्या पदावर भारतीय वंशाच्या एखाद्या स्त्रीची नेमणूक होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
कमला हॅरिस यांनी अमेरिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ट्विट करत आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटरवर आपला ‘बायो’ सुद्धा बदलला आहे. त्यावर त्यांनी स्वत:ला अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हटले आहे. यासह त्यांनी जो बायडन यांच्याशी बोलत असलेला एक व्हिडिओ शेअर केला आहे.