बिहारमध्ये दिवाळी कुणाची ? ‘निक्काल’ कुणाचा ?

राज-पाट

 

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी तिसºया आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर काही खाजगी सर्वेक्षण संस्था आणि वृत्तवाहिन्यांनी जाहीर केलेल्या ‘एक्झिट पोल’मध्ये मोठी कुरघोडी दाखवली आहे़भाजपसमर्थित एनडीएला महाआघाडीपेक्षा कमी जागा दर्शवल्या आहेत़ त्यामुळे पुढील शनिवारी दिवाळी सणासोबतच बिहार राज्यात सत्ताप्राप्तीची दिवाळी कोण साजरी करणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी 28 आॅक्टोबरपासून तीन टप्प्यात मतदान झाले असून 10 नोव्हेंबरला मतमोजणी होईल. मात्र, त्याआधी आता मतदान पार पडल्यानंतर विविध संस्थांचे ‘एक्झिट पोल’ समोर आले असून निवडणूक निकाल कुणाच्या बाजूने जाईल, याचा अंदाज वर्तवला आहे. यात एनडीएच्या तुलनेत महाआघाडी वरचढ असल्याचे दिसून येते़ केवळ एकाच वृत्तसंस्थेने एनडीएला दिलासा दिला आहे.
दरम्यान, बिहारमधील निवडणुकीच्या प्रचारात अनेक मुद्दे चर्चेत आले़ यात प्रामुख्याने बेरोजगारी, गरिबी, गुन्हेगारी, सामाजिक असुरक्षितता आदींचा समावेश होता. याशिवाय कोरोना काळात अनेकांनी आपले रोजगार, नोकरी गमावल्याचीही समस्या प्रकर्षाने समोर आली होती़ यात एनडीएसह महाआघाडीने लाखो रोजगार पूर्ततेचे जोरदार आश्वासन दिले़ असे असले तरी दोन दिवसांत निवडणुकीत निकाल कुणाला मिळतो आणि ‘निक्काल’ कुणाचा लागतो, हे दिसून येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *