Home राजधानी मुंबई मुख्यमंत्री काय देणाार दिवाळी भेट, आज जनतेशी संवाद

मुख्यमंत्री काय देणाार दिवाळी भेट, आज जनतेशी संवाद

84

मुंबई : राज्यात कोरोना संसर्गाची लाट ओसरत चालली असताना कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुक आणि यू-ट्यूब लाईव्ह जनतेला संबोधित करतील. लॉकडाऊन-5 ला 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देत आतापर्यंत अनेक उद्योगधंद्यांना अटी शर्थींसह परवानगी देण्यात आली आहे. चित्रपटगृहे, नाट्यगृहे अंशत: सुरू झाले असून रेस्टारन्ट्स आदींनाही नियमानुसार सुरू करण्यात आले आहेत.
याशिवाय दिवाळीनंतर 23 नोव्हेंबरपासून शाळाही सुरू करण्यात येणार आहे; परंतु अद्याप मंदिर उघडण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे आज मंदिर उघडण्याची घोषणा करतात का, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

‘फोर्स वन’ जवानांच्या आयुष्याची काळजी घेऊ

योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर शाळा सुरू करा