Home राज-पाट निकालाआधीच तेजस्वी यादव मुख्यमंत्री

निकालाआधीच तेजस्वी यादव मुख्यमंत्री

157

उद्या मंगळवारच्या निकालाआधीच महाआघाडीतील पक्ष राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या वाढदिवसानिमित्त बिहारमध्ये पोस्टर्समध्ये युवा मुख्यमंत्री म्हणून तेजस्वी यादव यांचा उल्लेख करण्यात आला आहे.
महाआघाडातील घटक पक्षांतील सहमतीने तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित केले होते. यानंतर प्रचारातही तेजस्वी यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीकेची एकही संधी सोडली नाही़ तसेच, आपल्या नागरिकांना विशेषत: युवकांना आपल्या खेचून घेण्यात यशस्वी ठरल्याचे सांगण्यात येते़ मुख्यत्वे कोरोना संकटातील बेरोजगारीचा मुद्दा उचलत त्यांनी राज्यातील जनतेची नाडी ओळखत प्रचार केल्याचा दावा केला जातो. महाआघाडीतील महत्त्वाचा पक्ष काँगे्रसने आपल्या हालचाली सुरू केल्या आहेत़ सत्तेवर येण्याच्या शक्यतेने बिहारमधील स्थिती सांभाळण्यासाठी तसेच मतमोजणीनंतर आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाचे सरचिटणीस अविनाश पांडे आणि रणदीपसिंग सुरजेवाला यांना पाटणामध्ये पाठवल्याचे वृत्त आहे. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर परिस्थितीत व्यवस्थापनाची सर्व जबाबदारी या दोन नेत्यांकडे सोपवण्यात आली आहे.
दुसरीकडे राज्यात पुन्हा एकदा भाजपप्रणित एनडीएचेच सरकार सत्तेत बसेल, असा दावा पक्षाचे नेते मनोज तिवारी यांनी केला आहे.
दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी तिसºया आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर काही खाजगी सर्वेक्षण संस्था आणि वृत्तवाहिन्यांनी जाहीर केलेल्या ‘एक्झिट पोल’मध्ये भाजपसमर्थित एनडीएला महाआघाडीपेक्षा कमी जागा दर्शवल्या होत्या. त्यामुळे पुढील शनिवारी दिवाळी सणासोबतच बिहार राज्यात सत्ताप्राप्तीची ‘दिवाळी’ कोण साजरी करणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी 28 आॅक्टोबरपासून तीन टप्प्यात मतदान झाले असून 10 नोव्हेंबरला मतमोजणी होईल. मात्र, त्याआधी आता मतदान पार पडल्यानंतर विविध संस्थांचे ‘एक्झिट पोल’ समोर आल. यात एनडीएच्या तुलनेत महाआघाडी वरचढ असल्याचे दिसून येते़ केवळ एकाच वृत्तसंस्थेने एनडीएला दिलासा दिला आहे.
दरम्यान, बिहारमधील निवडणुकीच्या प्रचारात अनेक मुद्दे चर्चेत आले़ यात प्रामुख्याने बेरोजगारी, गरिबी, गुन्हेगारी, सामाजिक असुरक्षितता आदींचा समावेश होता. याशिवाय कोरोना काळात अनेकांनी आपले रोजगार, नोकरी गमावल्याचीही समस्या प्रकर्षाने समोर आली होती़ यात एनडीएसह महाआघाडीने लाखो रोजगार पूर्ततेचे जोरदार आश्वासन दिले़ असे असले तरी उद्या मंगळवारी निकाल कुणाच्या बाजूने लागतो, हे दिसून येईल.