नागपूर

पदवीधर मतदारसंघासाठी संदीप जोशी यांचे नाव घोषित

(Last Updated On: November 9, 2020)

नागपूर : भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने नागपूर पदवीधर मतदारसंघातून आज महापौर संदीप जोशी यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. त्यामुळे त्यांचा सरळ सामना आता कॉंग्रेसचे अभिजीत वंजारी यांच्याशी होणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सुरुवात याच मतदारसंघातून झाली होती़ त्यानंतर प्रा. अनिल सोले यांनी तो आपल्याकडे ठेवला.
दुसरीकडे काँग्रेसतर्फे प्रा. बबनराव तायवाडे यांनी भाजपाविरोधात निवडणूक लढवली़ मात्र ते अपयशी ठरले. आता अभिजित वंजारी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. दरम्यान, मतदान १ डिसेंबरला होणार असून मतमोजणी ३ डिसेंबरला पार पडेल.