पूर्व विदर्भ

सिंचन नियोजनात गहू, हरभरा व उन्हाळी पिकाला प्राधान्य 

(Last Updated On: November 9, 2020)

वर्धा : बोर प्रकल्पातील पाण्याचे सिंचनासाठी नियोजन करताना यावर्षी गहू, हरभरा आणि उन्हाळी पीक घेताना जनावरांच्या चाºयासाठी घेण्यात येणाºया पिकांसाठी पाणी आरक्षण करून ठेवावे. त्याचबरोबर पाणीवाटप संस्थांच्या सक्रिय सहभागासाठी आर्वी आणि सेलू येथे कार्यशाळा घेण्यात याव्यात, अशा सूचना पालकमंत्री सुनिल केदार यांनी दिल्या.
आज जिल्हा परिषद सभागृहात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बोर प्रकल्पाची कालवे सल्लागार समिती आणि जिल्हास्तरीय पाणी वाटप समितीची बैठक पार पडली. यावेळी मंत्री केदार बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता जे. जी. गवळी, कार्यकारी अभियंता श्री.रहाणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी सत्यजित बडे, उपवन संरक्षक सुनील शर्मा, जिल्हा अधीक्षक कटुशी अधिकारी उपस्थित होते.

यावर्षी बोर प्रकल्प 100 टक्के भरला असून सिंचनासाठी 98.77 दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक आहे. यातून 13 हजार 500 हेक्टर क्षेत्र सिंचित होऊ शकते. याचे नियोजन करताना कृषी विभागाचा सक्रिय सहभाग दिसत नसल्याबाबत पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. कापसावर तीन वर्षांपासून गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होत आहे. यासाठी शासन शेतकºयांना फरतड घेऊ नका आणि एप्रिल, मे पर्यंत कापसाचे उत्पादन लांबवू नये असे सांगत असतानाही सिंचनासाठी पाणी देताना नोव्हेंबरच्या पुढे कापसाला 50 टक्के पाणी का ठेवण्यात आले? याबाबत श्री.केदार यांनी आक्षेप घेतला. यावर्षी पाणी शिल्लक आहे, त्याचा उपयोग गहू आणि हरभरा पिकाच्या क्षेत्रात वाढ करून त्याला सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शेतकरी दरडोई उत्पन्न कसे वाढविता येईल याचा विचार करून पिकांचे पद्धतीत बदल करावा. गहू 50 टक्के आणि हरभरा 25 टक्के तसेच इतर पिकासाठी 25 टक्के याप्रमाणे नियोजन करण्यास मंत्र्यांनी सांगितले.