Home राजधानी मुंबई एक महिन्याच्या वेतनासह अग्रिम देणार

एक महिन्याच्या वेतनासह अग्रिम देणार

85

मुंबई : कर्मचाºयांच्या मागील तीन महिन्यांच्या थकित असलेल्या वेतनापैकी आॅगस्ट महिन्याचे वेतन व दिवाळी सणानिमित्त देण्यात येणारा अग्रिम कर्मचाºयांच्या बँक खात्यात जमा होईल, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) अध्यक्ष तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मंत्री परब म्हणाले, की हे तात्पुरते संकट आहे. लवकरच ते दूर होईल. आपल्या कुटुंबावर संकट येऊ देऊ नका. काळ जरी कठीण असला तरी कुणी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये. उर्वरित दोन महिन्यांच्या वेतनापैकीसुद्धा एक महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी देण्यात येणार असून, बाकी एक महिन्याचे वेतनही लवकर मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. टाळेबंदीमुळे अत्यावश्यक सेवा वगळता पाच महिने एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. याकाळात एसटीला प्रवासी वाहतुकीतून मिळणाºया सुमारे ३ हजार कोटी रुपये महसुली उत्पन्नाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे इतर खर्च, वेतन, गाड्यांची देखभाल, बसस्थानकांची पुनर्बांधणी यापोटी थकित रक्कम वाढत गेली आणि वेतन थकीत राहिले आहे. हळूहळू प्रवासी संख्या दिवसागणिक वाढत असल्यामुळे लवकरच एसटीचे अर्थकारण पूर्वपदावर येईल. कर्मचाºयांचे वेतन व अनुषंगिक खर्चासंदर्भात मदतीसाठी शासनाकडे विनंती करण्यात आली असल्याचेही मंत्र्यांनी सांगितले.