BREAKING NEWS

बिहार विधानसभा निकाल : काँग्रेस समर्थित महाआघाडीची घसरगुंडी

(Last Updated On: November 10, 2020)

बिहार विधानसभा निकाल : काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल यांची महाआघाडी 109 तर भाजप नेतृत्वातील एनडीए 124 जागांवर आघाडीवर असल्याची प्राथमिक माहिती आहे. महत्त्वाचे म्हणजे भाजपा मोठा पक्ष ठरत असल्याचे दिसून येत आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाची मतमोजणी आज सकाळी आठ वाजतापासून सुरू झाली. मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असलेले तेजस्वी यादव, हम पक्षाचे जितन राम मांझी, श्रेयशी सिंह, तेज प्रताप यांनी आघाडी घेतली आहे. या राज्यात महाआघाडीची सत्ता येणार की एनडीए कायम ती कायम राखणार याकडे देशातील राजकारणाचे लक्ष लागलेले आहे.
दरम्यान, मागील शनिवारी तिसºया आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर काही खाजगी सर्वेक्षण संस्था आणि वृत्तवाहिन्यांनी जाहीर केलेल्या ‘एक्झिट पोल’मध्ये एनडीएला महाआघाडीपेक्षा कमी जागा दर्शवल्या होत्या. (सविस्तर वृत्त लवकरच…)