देश

कोविड-19 बाधितांची संख्या पाच कोटी

(Last Updated On: November 16, 2020)

बोस्टन (अमेरिका) : जगभरात कोविड-19 वैश्विक महामारीसंबंधित बाधितांची संख्या सुमारे पाच कोटींहून अधिक झाली आहे. ( covid-19 in america )
कोविड-19 प्रकरणावर विशेष अभ्यास करणाºया अमेरिकन विद्यापीठ जॉन हॉपकिन्सनुसार रविवारील जागतिक आकडेवारी 5.20 कोटींच्या पार गेली. तसेच,आतापर्यंत 12 लाखांहून अधिकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकात संक्रमणाचे 98 लाखांहून अधिक प्रकरण समोर आले, तर 2 लाख 37 हजार लोकांचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे जगातील काही देशांत ही लाट ओसरत असतानाच अमेरिकेत कोविड-19 चा हैदोस सुरूच आहे. या देशात दोन दिवसांपूर्वी शनिवारी 1. 26 लाखांपेक्षा अधिक प्रकरणे दिसून आली आणि एक हजारांहून अधिकांचा मृत्यू झाला. पीटीआयने या संबंधी वृत्त दिले आहे.