Home मनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य दक्षिणेतील अभिनेत्री स्विटीला जाणता काय…

दक्षिणेतील अभिनेत्री स्विटीला जाणता काय…

135

 

अनुष्का शेट्टी अर्थातच स्विटी शेट्टी ही दक्षिण भारतीय चित्रपटातील आघाडीची अभिनेत्री आहे. विशेषत: तेलुगु चित्रपट. हिंदी रसिकांना तिची ओळख ‘बाहुबली’ तून पटली. यातील ‘देवसेना’ चा अभिनय अनेकांना आवडला.

तिच्या महत्त्वाच्या चित्रपटांपैकी ‘भागमती’ हा महिला प्रधान चित्रपट आहे. ‘हॉरर थ्रिलर’ असलेल्या या चित्रपटात अनुष्काने आयएएस अधिकाºयाची भूमिका साकारली होती. सन 2015 मधील ‘साईझ झीरो’ मध्ये आपले वजन 20 किलोंनी वाढवल्याचे सांगण्यात येते.

अनुष्काची मुख्य भूमिका असलेल्या ‘अरुंधती’ या चित्रपटाने मोठी लोकप्रियता कमावली आहे. हा चित्रपट सुद्धा महिलाप्रधान आहे. तिने आतापर्यंत हिंदी चित्रपटांत अभिय साकारला नसला तरी याठिकाणी अनेक चाहते आणि रसिक आहेत.

सन 2005 मध्ये अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी अनुष्का योगा शिक्षिका होती. ‘सुपर’ हा तिचा पहिला चित्रपट समजला जातो. सध्या ती एका चित्रपटासाठी चार कोटींचे मानधन घेत असल्याची माहिती आहे. ‘रुद्रमादेवी’ साठी तिने पाच कोटींची मागणी केली होती. आतापर्यंत तिचे नाव बाहुबलीमधील सहकारी प्रभास आणि अन्य एक अभिनेता गोपीचंद सोबत तिचे नाव जुळले होते. 7 नोव्हेंबर 1981 ही तिची जन्मतारीख आहे.