मुंबई

राज्य परिवहन कर्मचाºयांचे पूर्ण थकीत वेतन दिवाळीपूर्वी

(Last Updated On: November 11, 2020)

मुंबई : शासनाकडून राज्य परिवहन महामंडळासाठी ( maharashtra state transport corporation ) पुढील सहा महिन्यांसाठी आर्थिक मदत म्हणून एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. एसटी कर्मचाºयांचे मागील तीन महिन्यांचे थकीत पूर्ण वेतन दिवाळीपूर्वी देण्यात येत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संबंधितांचे पूर्ण वेतन लवकर मिळावे अशीच शासनाची भूमिका होती़ तसेच, त्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू होते. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. आज उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्या सोबत बैठक झाल्यानंतर त्यावर मार्ग काढण्यात आला, असे मंत्री परब यांनी स्पष्ट केले.
टाळेबंदीमुळे अत्यावश्यक सेवा वगळता पाच महिने एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. याकाळात एसटीला प्रवासी वाहतुकीतून मिळणारे सुमारे ३ हजार कोटी रुपये महसुली उत्पन्नाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे इतर खर्च, वेतन, गाड्यांची देखभाल, बसस्थानकांची पुनर्बांधणी यापोटी थकीत रक्कम वाढत गेली आणि वेतन थकीत राहिले आहे. हळूहळू प्रवासी संख्या दिवसागणिक वाढत असून, लवकरच एसटीचे अर्थकारण पूर्वपदावर येईल. शासनाकडून आता आर्थिक मदत मिळाल्याने एसटीच्या अडचणी दूर होण्यास मदत होणार असल्याचेही श्री.परब यांनी सांगितले.