Home राज-पाट पुन्हा ‘एनडीए’च, पराभवानंतरही तेजस्वी शक्तीशाली

पुन्हा ‘एनडीए’च, पराभवानंतरही तेजस्वी शक्तीशाली

108

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याची संधी मिळणार आहे. भाजपप्रणित एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता कायम राखली आहे.  आपल्या नव्या उदयातून तेजस्वी यादव शक्तीशाली ठरले आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया आज पहाटेपर्यंत सुरू होती. सर्व २४३ जागांचे निकाल हाती आले आहेत. १२५ जागांमध्ये ७४ जागा भाजपने, ४३ जागा जेडीयू आणि मित्रपक्षांनी ८ जागांवर विजय मिळवला आहे. दुसरीकडे महाआघाडीने ११० जागा मिळवल्या आहेत. यामध्ये सर्वात चांगली कामगिरी तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षाने ( rashtriya janata dal ) केली आहे. या पक्षाने ७५ जागा मिळवल्या असून बिहारमधील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
काँग्रेसला १९ जागा मिळाल्या, तर डाव्या पक्षांना १६ जागांवर विजय मिळाला आहे. दुसरीकडे बिहारमध्ये एमआयएमला पाच जागा तर बसपा, लोजपा आणि अपक्ष यांना प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला आहे. दरम्यान, एनडीएला बहुमत मिळाल्याने नितीश कुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री होतील हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.