विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच पहिल्यांदा

राजकारण

मुंबई : भारतीय जनता पक्षाने देशातील ११ राज्यांमधील विधानसभा पोटनिवडणुकीत दणदणीत यश मिळवले आहे. ५८ जागांपैकी ४० जागांवर विजय मिळवला आहे. मध्य प्रदेशात २८ पैकी १९ जागा मिळवून बहुमत संपादित केले, तर काँगे्रसने ९ जागांवर विजय मिळवला. तसेच, उत्तर प्रदेशात सहा जागांवर भाजपने विजय राखला आहे.
उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या सात जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीतील ( vidhansabha bye-poll )  सात जागांपैकी भाजपने सहा, तर समाजवादी पक्षाने केवळ एक जागा जिंकली आहे. गुजरातमधील पोटनिवडणुकीतील सर्व आठही जागा भाजपने आपल्या ताब्यात राखल्या. दरम्यान, मणिपूर (पाच जागा), हरियाणा (एक), छत्तीसगड (एक), झारखंड (दोन), कर्नाटक (दोन), नागालँड (दोन), ओडिशा (दोन) आणि तेलंगणा (एक) मधील पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी झाली.
बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश कुमार ( niteesh kumar ) सलग चौथ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. या राज्यात भाजपला ७४, जेडीयू ४३ तर व्हीआयपी आणि एचएएम प्रत्येकी चार जागांवर विजयी ठरला. त्यामुळे एनडीएचा एकूण आकडा १२५ वर पोहोचला.
मतमोजणीच्या दिवशी मंगळवारी सकाळी राष्ट्रीय जनता दलाने काही जागांवर आघाडी घेतली होती. त्यामुळे पक्षाच्या गोटात आनंतदाचे वातावरण होते. मात्र, दुपारनंतर स्थिती बदलत गेली. अखेर एनडीएला १२५ जागांवर विजय मिळाला, तर महाआघाडी ११० जागांवर विजयी ठरली. महाआघाडीत आरजेडीला ७५, काँग्रेस १९ आणि डाव्यांना १६ जागा मिळाल्या आहेत.
दरम्यान, या विजयाबद्दल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे़ पी़ नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी बिहार जनतेचे आभार मानले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *