Home राजधानी मुंबई नागपूर हिवाळी अधिवेशनाबाबत मोठा निर्णय

नागपूर हिवाळी अधिवेशनाबाबत मोठा निर्णय

59

नागपूर/मुंबई : राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन ७ डिसेंबर २०२० पासून नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीमध्ये घेण्यात आला.

हिवाळी अधिवेशन राज्याची उपराजधानी नागपूर येथे आयोजित करण्यात येते; परंतु सध्या जगावर, देशात आणि राज्यावर असलेले कोरोनाचे संकट आणि राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता त्याबाबत विचारविमर्श करण्यासाठी मुंबईत विधानभवनात दोन्ही सभागृहाच्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. अनेक विधिमंडळ सदस्यांनी नागपूर येथे कोविडच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन घेणे उचित होणार नाही अशा सूचना यावेळी केल्या. यानंतर हिवाळी अधिवेशन उपराजधानी नागपूरऐवजी मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, ७ डिसेंबर २०२० रोजी अधिवेशन घेता येईल का आणि किती दिवस घ्यायचे याबाबतही नोव्हेंबर अखेर पुन्हा कामकाज सल्लागार समितीची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले. बैठकीत हिवाळी अधिवेशनासाठी लागणाºया सुविधांचाही आढावा घेण्यात आला.

बैठकीला विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोºहे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र्र फडणवीस (व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे) संसदीय कार्यमंत्री अ‍ॅड. अनिल परब, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्रिमंडळातील सदस्य, विधानसभा आणि विधानपरिषद सदस्य, विधान मंडळाचे सचिव राजेंद्र्र भागवत, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात अधिकारी-कर्मचारीवर्ग, कामकाज साहित्य आदी लवाजामा नागपुरात हलवावा लागतो़ मात्र, सध्याच्या कोरोना संसर्गाच्या काळात त्याबाबत अडचणी निर्माण होण्याच्या शक्यता होत्या. मात्र, यानिमित्ताने नागपुरातील विधानभवनाची रंगरंगोटी मात्र आटोपली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here