मुंबई

मल्टिप्लेक्स सिनेमासंबंधी अडचणी सोडवणार

(Last Updated On: November 12, 2020)

मुंबई : मल्टिप्लेक्स सिनेमा संदभार्तील अडीअडचणी सोडविण्याबाबत निश्चित प्रयत्न करू, असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.
मल्टिप्लेक्स सिनेमासंदर्भातील विविध अडीअडचणी सोडविण्याबाबत यूएफओ, सिनेपॉलीस व इतर कंपन्यांच्या शिष्टमंडळाने मंत्रालय येथे मंत्री श्री. पाटील यांना निवेदन दिले. मल्टिप्लेक्स सुरू करताना येत असलेल्या अडचणी, खाद्यपदार्थ थिएटरमध्ये घेऊन जाण्याची परवानगी तसेच कर परती व इतर अनुषंगिक बाबींबाबत मदत करावी,अशा मागण्यांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्यासमवेत चर्चा करून लवकरच प्रश्न मार्गी लावला जाईल, असे श्री. पाटील यांनी शिष्टमंडळाला सांगितले.
अभिनेते सुदीप पांडे, सिनेपॉलीसचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवांग संपथ, महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे उपाध्यक्ष रविंद्र मानगावे, यूएफओचे सचिव प्रकाश चाफळकर, पदाधिकारी,अरविंद चाफळकर, शिरीष देशपांडे, विष्णू पटेल आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.