मुंबई

नुकसान भरपाईबाबत पालकमंत्री राठोड यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

(Last Updated On: November 12, 2020)

मुंबई : यवतमाळ जिल्ह्यात सप्टेंबर व आॅक्टोबर 2020 या कालावधीत झालेल्या अवेळी व सततच्या पावसामुळे आणि बोंडअळीच्या प्रादुभार्वामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याबाबत वनमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली.यवतमाळ जिल्ह्यात अवेळी पडलेल्या संततधार पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे तसेच कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत याबाबत वनमंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत चर्चा केली व याबाबत नुकसानभरपाई करीता प्राथमिक अहवालाच्या आधारे जिल्हाधिकारी यांनी कळवल्याप्रमाणे 315 कोटी निधी उपलब्ध देण्यात यावा,अशी आग्रही मागणी केली.