Home उपराजधानी नागपूर पंकजा मुंडे यांच्यावर पक्षाने सोपवली मोठी जबाबदारी

पंकजा मुंडे यांच्यावर पक्षाने सोपवली मोठी जबाबदारी

92

नागपूर : माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर भारतीय जनता पक्षाने फार मोठी जबाबदारी सोपवली आहे. पक्षाने शुक्रवारी 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी प्रभारी आणि सह प्रभारींची नावे जाहीर केली आहेत. यात महाराष्ट्रातील काही नेत्यांकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. माजी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजया रहाटकर, सुनील देवधर यांचा समावेश आहे. विनोद तावडे यांची हरियाणा प्रदेश भाजप प्रभारीपदी, सुनील देवधर यांची आंध्रप्रदेश सह प्रभारी पदी, पंकजा मुंडे यांची मध्य प्रदेश सह प्रभारी पदी आणि विजया रहाटकर यांची दमन दीव – दादरा – नगर हवेली प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून सी. टी. रवी यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्याकडे महाराष्ट्रासह गोवा आणि तामिळनाडूचीही जबाबदारी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी राधा मोहन सिंह यांची, तर पश्चिम बंगालची जबाबदारी कैलास वर्गिय यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.