दिवाळीचा आध्यात्मिक दृष्टीकोन… SAAY pasaaydan

रानशिवार

 संत राजिन्दर सिंहजी महाराज

दिवाळी व रोषणाईच्या या सणाच्या दिवशी सर्व लोक दिवे, मेणबत्ती व लॅम्प इत्यादी प्रज्वलित करून रोषणाई करतात. हा सण प्रभू श्रीराम आणि माता सीता यांच्या 14 वर्षांच्या वनवासा पश्चात अयोध्येमध्ये त्यांच्या आगमना प्रित्यर्थ साजरा केला जातो. भारतात या सणाला सर्व लोक आपली घरे व दुकाने स्वच्छ करून सजवतात. हे शरद ऋतूच्या आगमनाचे सुद्धा प्रतीक आहे. आनंदाच्या या सणाला सर्व लोक एकमेकांना मिठाई वाटून व मिळून मिसळून साजरा करतात.

रोषणाईचे प्रतीक असलेल्या दिवाळी सणाचा एक आध्यात्मिक पैलू आपणाला समजावतो की आपल्या अंतरी सुद्धा प्रभूची ज्योत विद्यमान आहे आणि आपण त्याचा अनुभव आपल्या आत्म्याच्या द्वारे करू शकतो. हा प्रत्येक मनुष्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे की तो आपल्या जीवनात प्रभूच्या ज्योतीचा अनुभव करू शकेल आणि पुन्हा प्रभूशी एकरुप होऊ शकेल. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपल्या अंतरी प्रभू प्राप्तीची तीव्र इच्छा उत्पन्न होईल. प्रभूने जेव्हा आपल्याला या संसारात पाठविले तर परतीचा मार्ग सुद्धा आपल्याकरिता बनविला आहे. त्यांनी प्रत्येक व्यक्तीला काही खास शक्ती दिली आहे. जर आपल्यापैकी कुणी असे म्हणेल की आपणास आपल्या घरी परत घेऊन चला तर ते आपली हाक जरूर ऐकतील; परंतु आपली ही प्रार्थना कोणाच्या दबावाखाली नसावी.

ज्याप्रकारे एक श्रीमंत व्यक्ती आपली दौलत वाटू इच्छितो; पण तो प्रत्येकाला देत नाही. तो वाट पाहतो आणि जे लोक या दौलतीची मागणी करतात केवळ त्यांनाच तो वाटतो. ज्याप्रकारे एक डॉक्टर केवळ त्याच रोग्याला ठीक करतो जो त्याच्याकडे आपला आजार घेऊन जातो आणि त्याच्याकडे आजार ठीक करण्याची विनंती करतो. ठीक, अशाच प्रकारे प्रभूकडे आपणा सर्वांकरिता आध्यात्मिक खजिने आहेत. जर अशांना ते प्रदान करतील ज्यांची इच्छा नसेल तर ते त्या खजिन्याचा स्वीकार करणार नाही आणि त्याचा महिमा सुद्धा जाणणार नाही. कारण त्यांनी यासाठी प्रभूकडे कधी प्रार्थना केलेली नसते. पिता परमेश्वर तोपर्यंत आपली वाट पाहतात जोपर्यंत आपण त्यांच्याकडे मागणी करत नाही. एकदा जर आपल्या अंतरी प्रभू प्रेमाला प्राप्त करण्याची बेचैनी निर्माण झाली तर ते अवश्य त्याच्या प्राप्तीकरता आपली मदत करतील.

केवळ मनुष्य योनीमध्येच आपण आपल्या आत्म्याचे मिलन परमात्म्याशी करू शकतो; परंतु काही असे भाग्यशाली लोक असतात, की जे आपल्या जीवनात या ध्येयाला पूर्ण करतात. आपण सर्वजण प्रभू प्रेमाच्या मस्तीला प्राप्त करू शकतो. चला तर, आपण मानवजीवनातील या सुवर्णसंधीला गमावता कामा नये. आपले ध्यान अंतर्मुख करून प्रभूच्या ज्योतीला आपल्या अंतरी प्रज्वलित करावे. ज्या प्रकारे आपण दिवाळीत मेणबत्त्या इत्यादी प्रज्वलित करतो, त्याप्रमाणे आपण ध्यान-अभ्यासाला बसावे आणि आपल्या अंतरी प्रभूच्या ज्योतीच्या प्रकाशाचा अनुभव करावा.

आपल्या ध्यानाला अंतर्मुख करण्याचा हा ध्यान-अभ्यासाचा विधी खूपच सोपा आहे. ज्यामध्ये आपण शरीराला शांत करून, ध्यान दोन्ही डोळ्यांच्या मधोमध शिवनेत्रावर एकाग्र करावे. आपल्या विचारांना नामस्मरणाद्वारे शांत करून आपल्या अंतरी प्रभूची ज्योती प्रज्वलित करावी, ज्याद्वारे आपला आत्मा आंतरिक अध्यात्मिक मंडलांचा प्रवास करून परमात्म्याशी एकरूप होईल.

चला तर, दिवाळीच्या या पावन पर्वाला केवळ बाह्यरुपाने रोषणाई करून आपण याचा आनंद न लुटता, प्रतिदिन ध्यान-अभ्यासामध्ये समय द्यावा, जेणेकरून आपण आपल्या अंतरी प्रज्वलित असणाºया प्रभूच्या ज्योतीचा अनुभव करूया आणि दररोज दिवाळीच्या या सणाला आपल्या अंतरी साजरा करूया. तसेच सदैव सुख, समाधान व शांती प्राप्त करूया.

*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *