दिव्यांची रोषणाई, आतषबाजी, फटाक्यांच्या धडाडधूममध्ये लक्ष्मीपूजन

उपराजधानी नागपूर

नागपूर : भारतीयाचा सर्वांत मोठा सण म्हणजे दिव्यांची आरास असलेला, दीपांची माळा लखलखणारा दिवाळी उत्सव आज उत्साह आणि आनंद तसेच मांगल्यपूर्ण वातावरणात साजरा करण्यात येत आहे. ( diwali in nagpur)
दिव्यांची रोषणाई, आतषबाजी, फटाक्यांची धडाडधूम आणि त्याबरोबरीने आनंदाची उधळण करणारा हा सण महाराष्ट्र राज्यासह देशविदेशात साजरा केला जात आहे. दिवाळीच्या पाच दिवसांपैकी तिसरा मुहूर्त म्हणजे आजचे लक्ष्मीपूजऩ घर असो किंवा कार्यालय या सणादरम्यान लक्ष्मीपूजनाला प्रत्येक ठिकाणी अनन्यसाधारण महत्त्व आहे. यासाठी मनोकामना केली जाते. याशिवाय या सणाला पौराणिक महत्त्व असल्याचे सांगण्यात येते.

अश्विनी गोरले, अभिनेत्री

सोबत कोरोनाही…
दरम्यान, यंदाच्या दीपोत्सवावर सध्या कोरोना महामारीचे सावट आहे. केंद्र आणि राज्य सरकारने कोरोनासंबंधी सर्व नियम पाळून हा सण साजरा करण्यास परवानगी दिलेली आहे़ लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असल्याने दिवाळीत थोडासा उत्साह दिसून येत आहे. तरीही बाजारपेठांवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येते.

रांगोळी रेखाटन : वैष्णवी ढोले

फटाक्यांवर बंदी
फटाक्यात वापरल्या जाणाºया बारुदपासून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याने सरकारने मोठ्या आवाजाचे तसेच प्रदूषण करणाºया फटाक्यांवर बंदी आणली आहे़ त्याऐवजी पर्यावरणपूरक आतषबाजी करण्याचे आवाहन केले आहे़ याशिवाय देशातील अनेक शहरात फटाके फोडण्याच्या वेळा आखून दिल्या आहेत. कारण सध्या कोरोनाचे संकट कायम असल्याने या आजाराच्या रुग्णांना श्वसनास मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो़ याशिवाय हृदयरोगी, वृद्ध यांना आवाजाचा त्रास होत असल्यामुळे मर्यादित स्वरुपात फटाक्यांचा वापर करावा, असे शासन, प्रशासनाने म्हटले आहे. त्याला नागरिक किती प्रतिसाद देतात, हे पाहता येणार आहे.
दरम्यान, काल धनत्रयोदशीला उपराजधानी नागपुरातील बाजारपेठेतही चांगले वातावरण दिसून आले. व्यापारी सूत्रांनुसार, धनत्रयोदशीला खरेदीबाबत लोकांमध्ये चांगला उत्साह दिसून आला. ग्राहकांनी सोने-चांदी, भांडी आणि भेटवस्तूंच्या दुकानांमध्ये सर्वाधिक गर्दी केली होती. असे असले तरी लोकांमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीमुळे मागील वर्षाच्या तुलनेत फारसा व्यवसाय झाला नाही, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *