मुंबई

अखेर प्रार्थनास्थळे दार उघडणार,पण…

(Last Updated On: November 15, 2020)

मुंबई : पाडव्यापासून राज्यातील विविध धर्मिय प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असून, कोरोनारुपी राक्षसाचा धुमाकूळ विसरता येणार नाही. पुढील काळात बेसावध राहून चालणार नाही. त्यामुळे सर्वांनी नियमांचे आणि अर्टीचे पालन करणे गरजेचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (chief minister udhhav thakare) यांनी केले आहे.
राज्यातील जनतेने कोरोना काळात शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव-देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, पंढरीची वारी, गणेशोत्सव, नवरात्र आदींबाबत शिस्त पाळावी लागली़ अन्य धर्मियांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस्त पाळली, असे मुख्यमंत्री म्हणाले.
प्रार्थनास्थळे बंदी असली तरी डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्ड बॉयच्या रुपाने ‘देव’ पांढºया कपड्यांत भक्तांची काळजी घेत होता. आता पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र, त्यासाठी नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. गर्दी टाळून स्वत:बरोबर इतरांचे रक्षण करा, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. या काळात सर्वच प्रार्थनास्थळे बंदी असली तरी डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्ड बॉयच्या रूपाने ‘देव’ पांढऱ्या कपड्यांत भक्तांची काळजी वाहत होता. देव आपल्यातच होते, पण आता उद्याच्या पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा व स्वत:बरोबर इतरांचे रक्षण करा. हा फक्त सरकारी आदेश नसून ‘श्रीं ची इच्छा समजा! मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका. मंदिरे उघडतील, इतर प्रार्थनास्थळे उघडतील. आपण शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद आपल्याला व महाराष्ट्राला मिळतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.