मुंबई

वीज कर्मचाºयांना बोनस जाहीर

(Last Updated On: November 15, 2020)

मुंबई : राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी वीज कर्मचाºयांना बोनस जाहीर केला असून, मागील वर्षीप्रमाणेच हा बोनस दिला जाणार आहे. दरम्यान, वीज कर्मचाºयांच्या संघटनांनी अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही.
ऐन दिवाळीत वीज कर्मचाºयांनी संप पुकारण्याची घोषणा केल्याने राज्यावर सणासुदीत काळोख होण्याची भीती निर्माण झाली होती. शुक्रवारी दुपारी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासोबतची राज्यभरातील 25 संघटनांची आॅनलाईन सुरू असलेली बैठक फिस्कटली होती. दरम्यान, आता बोनस देण्यासाठी 125 कोटी रुपये द्यावे लागणार असून, एक लाख कर्मचाºयांना याचा फायदा मिळणार आहे.