विदर्भ

गृहमंत्र्यांच्या ऐतिहासिक भेटीने पोलिस कर्मचारी भारावून गेले

(Last Updated On: November 15, 2020)

गडचिरोली : नक्षलवादी हिंसाचाराविरोधात लढणाºया गडचिरोली जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम भागाला दिवाळीनिमित्त सपत्नीक भेट देऊन गृह मंत्री अनिल देशमुख ( home minister anil deshmukh with gadchroli police in diwali) यांनी पोलिस जवानांची उमेद वाढविली. देशमुख यांनी शनिवारी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी गडचिरोलीपासून सुमारे 300 किलोमीटर अंतरावर असलेल्या छत्तीसगड सीमवरील पातागुडमला भेट देऊन जवानांसोबत दिवाळी साजरी केली.

शनिवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास अनिल देशमुख आणि त्यांच्या पत्नी आरतीताई हेलीकॉप्टरने पातागुडम येथे पोहोचले. यावेळी गडचिरोली परिक्षेत्राचे उपमहानिरिक्षक संदीप पाटील, गडचिरोलीचे अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त अधीक्षक मनीष कलवनिया, सिरोंचा विभागाचे प्रांत अधिकारी प्रशांत स्वामी उपस्थित होते.

दिवाळीच्या निमित्ताने प्रथमच गृह मंत्री येत असल्याने पोलिसांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. गृहमंत्र्यांनी येथील पोलिसांशी संवाद साधला. नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांची आस्थेने चौकशी केली. या भागामध्ये दौंड आणि कोल्हापूर येथील राज्य राखीव पोलिस बलाच्या तुकड्या कार्यरत आहेत. त्यांचे गृहमंत्र्यांनी विशेष कौतुक केले.
गृहमंत्री देशमुख म्हणाले, की भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देणाºया दिवाळीचा आनंददायी सण कुटुंब व मित्रांसोबत साजरा करायला मिळत नाही. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात पोलिस घरापासून, आपल्या आईवडिलांपासून, भावंडांपासून, पत्नी-मुलाबाळापासून दूर असाल, याची मला जाणीव आहे. तेव्हा पोलिस दलाचा कुटुंबप्रमुख म्हणून मला मनापासून वाटलं की मी तुमच्यात यायला हवं. माझं पोलीस दल कर्तव्यावर असताना मी माझ्या घरात, पत्नी-मुलांसमवेत दिवाळी साजरा करत बसलो असतो तर मनाला रुखरुख लागली असती. म्हणून ठरवलं की तुमच्याकडं यायचं आणि काही वेळ तरी तुमच्या सोबत घालवायचा.
उपमहानिरिक्षक संदीप पाटील म्हणाले, की या ठिकाणी कार्यरत असणाºया पोलिस कर्मचाºयांची राहण्याची व्यवस्था बराकमध्ये केली आहे. त्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबियांसमवेत राहता येत नाही. गृहमंत्र्यांनी हा प्रश्न तातडीने सोडविण्याचे आश्वासन दिले. पोलिसांच्या इतर अडचणी समूजन घेत सरकार सदैव पोलिस दलाच्या पाठीशी असल्याची ग्वाही श्री. देशमुख यांनी दिली.
गडचिरोलीतील अत्यंत दुर्गम प्रदेश असलेल्या पातागुडम येथे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या ऐतिहासिक भेटीने पोलीस कर्मचारी भारावून गेले. येथील महिला कर्मचाºयांची देशमुख दाम्पत्याने आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.