मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंडित जवाहरलाल नेहरू यांना अभिवादन

(Last Updated On: November 15, 2020)

मुंबई : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले. तसेच, बाल दिनाच्याही शुभेच्छा दिल्या.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिले पंतप्रधान म्हणून जवाहरलाल नेहरू यांनी देशाच्या विकासाचा सर्वसमावेशक असा मार्ग आखून दिला. त्यामुळेच जागतिक पातळीवर आज देशाने वेगळी ओळख निर्माण केली आहे,अशा भावना मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी व्यक्त केल्या.
देशाला विकास मार्गावर नेण्याचे आव्हान होते. पंडित नेहरू यांनी पहिले पंतप्रधान म्हणून हे आव्हान पेलले. त्यांनी विकासाचा सर्वसमावेशक असा मार्ग आखून दिला. त्यांच्या दूरदृष्टीमुळे देशाच्या विकास धोरणात शिक्षण-संशोधन आणि विज्ञान-तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला. उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्यात आले, असेही ते म्हणाले.
पं. नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा करण्यात येणाºया ‘बालदिना’च्या मुख्यमंत्री श्री. ठाकरे शुभेच्छा दिल्या. यानिमित्ताने मुलांमधील बालसुलभ कुतूहल जपताना त्यांच्यामध्ये जागतिक परिस्थिती आणि देशप्रेम याबाबतचे भान संवेदनशीलतेने पेरावे लागेल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.