Home राजधानी मुंबई शिक्षणमंत्र्यांनी शाळा सुरू करण्याबाबत मागवल्या सूचना

शिक्षणमंत्र्यांनी शाळा सुरू करण्याबाबत मागवल्या सूचना

96

मुंबई : इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी संस्थाचालक, तज्ज्ञ, पालक, विद्यार्थी, शिक्षकांकडून सूचना मागवल्या आहेत.
सरकारने येत्या २३ नोव्हेंबरपासून काही वर्ग सुरू करण्याचा निर्णय ेघेतला असला तरी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत पालकांचे संमतीपत्रक सादर करणे बंधनकारक असेल. शाळा सुरू होण्यापूर्वी प्रत्येक शिक्षक तसेच कर्मचाºयाची कोविड चाचणी करून, सुरक्षा उपायांच्या अनुषंगाने आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणेही शाळांना बंधनकारक असणार आहे.
दरम्यान, कोरोना विषाणू संकट पूर्णपणे आटोक्यात येईपर्यंत शाळा सुरू करण्यास काही पालकांचा विरोध कायम आहे. अनेकांनी ‘सामाजिक संपर्क माध्यमा’वरून नोंदवलेल्या आक्षेपांची दखल घेत शिक्षणमंत्र्यांनी अधिकाºयांची बैठक घेऊन मते जाणून घेतली. इतर विविध स्तरावरूनही सूचना, मते मागवण्यात आली आहेत.