Home राष्ट्रीय नितीश कुमार यांचा आज शपथविधी

नितीश कुमार यांचा आज शपथविधी

96

पाटणा : बिहारचे नवे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार आज,सोमवारी दुपारी पदाची शपध घेणार आहेत. उपमुख्यमंत्री पदाबाबत मात्र अद्याप चित्र स्पष्ट झाले नाही.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंग पाटण्यात दाखल झाल्यानंतर सगळी चक्र वेगात फिरली. रविवारी नितीश कुमार यांची नेतेपदी निवड करण्यात आली होती. त्यानंतर राजनाथ सिंग, नितीश कुमार आणि घटकपक्षांच्या नेत्यांची बैठक झाली त्यात मंत्रिमंडळाबाबत चर्चा करण्यात आली आहे.
दरम्यान, भाजप आमदारांची संख्या जास्त असल्याने मंत्रिमंडळात जास्त जागा आणि महत्त्वाची खाती मिळू शकतात. जेडीयूला कमी जागा मिळाल्याने आता भाजप वरचढ राहणार आहे, हे निश्चित आहे. घटक पक्षांचे किती सदस्य मंत्रिमंडळात असावेत याबाबत चर्चा सुरू आहेत.
बिहारचे भाजप प्रभारी तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही पाटण्यात दाखल झाले आहेत. सत्तावाटपाच्या चर्चेत त्यांची भूमिका महत्त्वाची राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, सोमवारी नितीश कुमार यांच्यासोबत काही मंत्री सुद्धा शपथ घेतील.