नागपूर

विदर्भ वतनच्या ‘दीपोत्सव-२०२०’ चे प्रकाशन

(Last Updated On: November 16, 2020)

नागपूर : साप्ताहिक वृत्तपत्र विदर्भ वतन तसेच न्यूज पोर्टलच्या ‘दीपोत्सव-२०२०’ चे प्रकाशन लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर करण्यात आले.
‘विदर्भ वतन’ कार्यालयात पार पडले़ल्या प्रकाशन सोहळ्याला मुख्य संपादक गोपाल कडूकर, अभिनेत्री अश्विनी गोरले, अक्षरक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच लेखक शंकर घोरसे, लेखक राजेश वैरागडे,कथालेखक-गीतकार संजय मुंदलकर, चित्रपट निर्माता-दिग्दर्शक संजय भुजाडे, उद्धव वाटकर, भाग्यलता तळखंडे तसेच ‘विदर्भ वतन’ परिवारातील गीता जाधव, नरेंद्र्र डोये, पंकज जिचकार, रामचंद्र थेरे यांच्यासह हितचिंतक उपस्थित होते़
दरम्यान, वृत्तपत्राच्या वतीने दरवर्षी दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात येते़ अंकाचे यंदा पाचवे वर्षे आहे़ अंकामध्ये महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिकांचे लेख, ललित, कथा, कवितांचा आदींचा समावेश आहे़ तसेच, अंकाच्या मुखपृष्ठावर महाराष्ट्रीय परंपरागत पेहरावातील अभिनेत्री अश्विनी गोरले यांच्या छायाचित्राला स्थान मिळाले आहे.