Home प्रादेशिक पश्चिम महाराष्ट्र भाविकांसाठी राज्यातील मंदिरे,प्रार्थनास्थळे खुली

भाविकांसाठी राज्यातील मंदिरे,प्रार्थनास्थळे खुली

89

राज्यातील मंदिरांसह सर्व धार्मिकस्थळे सोमवारपासून (16 नोव्हेंबर 2020) सुरू करण्या राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मात्र, कोरोनासंबंधी नियम पाळणे बंधनकारक असल्याचेही सांगितले आहे. त्यानुसार राज्यातील सर्वच प्रमुख मंदिर संस्थानांनी आपापली नियमावली तयार केली आहे.

शिर्डी : सरकारने सोमवारपासून राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर श्री साई संस्थान जय्यत असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला केवळ सहा हजार भविकच दर्शन घेऊ शकणार आहेत. मात्र, त्यांच्याकडे आॅनलाईन दर्शन पास असणे गरजेचे आहे. एरवी 50 हजार भक्त दररोज शिर्डीत दर्शन घेत असतात.
मंदिर सुरू झाल्यानंतर भाविकांनी गर्दी न करू नये. तिरुपती बालाजी मंदिर संस्थानच्या धर्तीवर केवळ आॅनलाईन पास असणाºया भाविकांनाच दर्शन दिले जाणार असल्याच स्पष्ट करण्यात आले आहे. समाधी मंदिर व्यतिरिक्त प्रसादालय, भक्त निवास कधी व कसे सुरू होणार याबाबत बैठक घेतली जाणार असून यात सविस्तर नियमावली जाहीर करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील आठ महिन्यांपासून बंद असलेली राज्यातील प्रार्थनास्थळे सुरू करण्याची परवानगी दिली तरी कोरोनासंदर्भातील खबरदारी म्हणजे मास्क, हँड सॅनिटायजर, शारीरिक दूरता यांचे पालन करणे भाविकांना बंधनकारक आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सदर निर्णय घोषित केल्यानंतर ग्रामस्थांनी फटाके वाजवत व एकमेकांना पेढे भरवत जल्लोष केला.

नाशिक
नाशिक जिल्ह्यातील माता सप्तश्रृंगी मंदिर व्यवस्थापनाने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी अशाप्रकारे व्यवस्था केली आहे. (छायाचित्र सौजन्य : रोशन मुंदलकर,सप्तश्रृंग गड)

कोल्हापुरात केवळ सहा तासांचा कालावधी
कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरही सुरू होत आहे. उद्यापासून भाविकांना सकाळी 9 ते 12 आणि सायंकाळी 4 ते 7 या वेळेत दर्शन घेता येणार आहे. यानिमित्ताने देवस्थान समितीने नियमावली तयार केली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अंतर्गत अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिर यासह सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील 3 हजार 042 मंदिर उद्या खुली होणार आहेत.
दिवसभरात तीन हजार भाविकांना दर्शन मिळेल, पूर्व दरवाजातून भाविकांना प्रवेश तर दक्षिण दरवाजातून बाहेर जाता येईल. मंदिराच्या आतील आवारातील दुकान बंद राहणार, भाविकांना कासव चौक-पितळी उंबºयापासूनच अंबाबाई देवीचे दर्शन घ्यावे लागेल. भाविकांना मंदिर परिसरात फिरता येणार नाही, मंदिरात प्रवेश करताना भाविकांना थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझरचा वापर करूनच प्रवेश मिळणार, मास्क नसेल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही, 10 वर्षां खालील लहान मुले आणि ज्येष्ठ वयोवृद्ध नागरिकांना तूर्तास दर्शन नाही. नाशिक जिल्ह्यातील वणी तालुक्यातील सप्तश्रृंगी देवी मंदिर ( saptashrungi mandir ) सोमवारी पहाटे पाच वाजून पाच मिनिटांनी उघडले जाणार आहे.
याशिवाय राज्यातील अन्य प्रमुख मंदिर व्यवस्थापनानेही काही नियम जारी केले आहे.