Home उपराजधानी नागपूर नागपुरात 20 लाखांचे दागिने जप्त

नागपुरात 20 लाखांचे दागिने जप्त

85

नागपूर : मागील दीड वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला
बजाज नगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून सुमारे 20 लाख 54 हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज जप्त केला आहे. तपासणीत त्याच्याकडून चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (प्रतिकात्मक छायाचित्र)
युवतीचे कुजलेले शव आढळले
सोनेगांव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जयताळा बाजार चौकाजवळ एका झोपडीजवळ युवतीचे पोत्यात असलेले कुजलेले शव मिळून आले. शव नग्न अवस्थेत आणि तिचा एक हात सुद्धा कापलेला होता. तिच्या लैंगिक अत्याचार करून हत्या केली असावी, असा संशय असून पोस्टमार्टमनंतरच पुढे येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.