Home उपराजधानी नागपूर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आठवा स्मृतीदिन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आठवा स्मृतीदिन

73

नागपूर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( balasaheb thakare ) यांचा आज आठवा स्मृतीदिन आहे. या निमित्ताने त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात येत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह मुंबईतील दादरमधील शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला आदरांजली वाहणार आहेत. आज सकाळपासूनच शिवसैनिक स्मृतिस्थळाच्या दर्शनासाठी शिवतीर्थावर येत आहेत. दरम्यान, कोरोना संसर्ग अद्याप कायम असल्याने अभिवादनासाठी येणाºया सर्वांना मास्क वापरणे आणि शारीरिक दूरता राखणे बंधनकारक केले आहे.