रोजगार...दिशादर्शक व्रत

यूपीएससी मुख्य परीक्षा व मुलाखतीची तयारी करणाºया अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य

(Last Updated On: November 18, 2020)

मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा मुख्य परीक्षेची व मुलाखतीची तयारी करणाºया अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी या वर्षापासून आर्थिक सहाय्य करण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत परीक्षेची तयारी करणाºया उमेदवारांना दरमहा १२ हजार रुपये विद्यावेतन व १४ हजार रुपये पुस्तक खरेदीसाठी असे एकूण २६ हजार रुपये देण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री अड.के.सी. पाडवी यांनी दिली.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये तसेच अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांचे प्रशासकीय सेवेत प्रमाण वाढावे, यासाठी आदिवासी विकास मंत्री श्री.पाडवी यांनी ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या योजनेअंतर्गत यूपीएससीच्या पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन मुख्य परीक्षेची तयारी करणाºया २५ व मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखतीची तयारी करणाºया २५ अशा अनुसूचित जमातीमधील एकूण ५० उमेदवारांना ही आर्थिक मदत मिळणार आहे. सन २०२०-२१ पासून ही योजना लागू होणार असून आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत या विद्यार्थ्यांची निवड करून थेट त्यांच्या बँक खात्यात रक्कम वितरित करण्यात येणार आहे.
लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा स्पर्धा परीक्षांमध्ये अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा, या समाजातील जास्तीत जास्त तरुणांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करावी व प्रशासकीय अधिकारी व्हावे, यासाठी हा निर्णय घेतला आहे.