पश्चिम महाराष्ट्र

पंढरपूर विठ्ठल मंदिरात ‘इतकेच’ भाविक हवेत…

(Last Updated On: November 19, 2020)

पंढरपूर : पाडव्याच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल रक्मिणी मंदिर भाविकांसाठी खूले करण्यात आले आहे. भाविकांची वाढती गर्दी व मागणी लक्षात घेता मंदिर ( vithhal mandir pandharpur ) समितीच्या वतीने बुधवारपासून (18 नोव्हेंबर) दोन हजार भाविकांना दर्शनाला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियम व अटींची अंमलबजावणी करतच दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यातील मंदिरे, धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे राज्य शासनाने उघडण्यास परवानगी दिली आहे. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी दररोज एक हजार भाविकांना दर्शनाकरिता सोडण्यात येत होते, आता दर्शनाकरिता दोन हजार भाविकांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोना संसर्गासंबंधी सुरक्षित काळजी घेण्यासाठी मंदिर समितीच्या वतीने श्रीविठ्ठल रुक्मिणी गाभारा, श्री विठ्ठल सभामंड, रुक्मिणी सभामंडप, नामदेव पायरी, दर्शनरांग आदींची कर्मचाºयांकडून वेळोवेळी स्वच्छता करण्यात येत आहे. मंदिरात व नामदेव पायरी ते दर्शन रांगेत स्वच्छतेबरोबरच सॅनिटायझर फवारण्यात येत आहे. दर्शनरांगेत दोन भाविकांमध्ये ‘सोशल डिस्टन्स राखला जाईल आदीबाबत खबरदारी घेण्यात येत आहे, तसेच, भाविकांकरिता सॅनिटायझरची सोय, थर्मल स्क्रिनिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. याशिवाय प्रत्येकाला मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे.
दरम्यान, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने नेहमीप्रमाणे सकाळी सहा वाजतापासून भाविकांना दर्शनाची सोय उपलब्ध केली आहे.                                     काही नियम
* सकाळी 6 ते रात्री 9 दरम्यान दोन हजार भाविकांना मुखदर्शन घेता येईल
* प्रतितास 200 भाविकांना दर्शनासाठी सोडणार
* दर्शनासाठी आॅनलाईन नोंदणी करावी
* भाविकांनी 24 तास अगोदर आॅनलाईन बुकिंग करावे
* कोरोनाची लक्षणे आढळणाºयांना दर्शन प्रवेश बंद
* सध्या 65 वर्षांवरील नागरिक, 10 वर्षाखालील बालक, गर्भवती, आजारी व्यक्तींनी येणे टाळावे.