उतर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र

ग्रामीण स्वच्छता: कोल्हापूर,नाशिक जिल्ह्याला राष्ट्रीय पुरस्कार

(Last Updated On: November 18, 2020)

कोल्हापूर/नाशिक : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत केंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयातर्फे जागतिक शौचालय दिनानिमित्त होणाºया कार्यक्रमामध्ये कोल्हापूर आणि नाशिक या जिल्ह्यांना राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. ग्रामीण स्वच्छता क्षेत्रातील या विशेष पुरस्कारामुळे राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
केंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता विभागाच्या वतीने जागतिक शौचालय दिनानिमित्ताने देशभरातील उत्कृष्ट कामगिरीच्या जिल्ह्यांबाबत स्वच्छतेच्या अनेक निकषांचे विश्लेषण आणि अभ्यास करून २० जिल्ह्यांची पुरस्कारासाठी निवड केली आहे. यात कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यांचा समावेश आहे. ९ नोव्हेंबर २०२० रोजी जागतिक शौचालय दिनानिमित्त दोन्ही जिल्ह्यांना दूरदृष्य प्रणालीद्वारे होणाºया कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण होणार आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेन्द्रसिंग शेखावत आणि राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्काराचे दूरदृष्य प्रणालीद्वारे वितरण होणार आहे.
महाराष्ट्रातील या दोन्ही जिल्हा परिषदांचे पदाधिकारी, अधिकारी व सर्व यंत्रणेने केलेल्या श्रमाची ही फलश्रुती आहे. २ आॅक्टोबर २०२० रोजी झालेल्या स्वच्छ भारत दिवस कार्यक्रमात राज्याला ५ पुरस्कार मिळाले होते, आज आणखी दोन जिल्ह्यांना पुरस्कार घोषित होणे ही राज्यासाठी निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे असे मत, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.