नागपूर

नागपुरात गोळीबार, एकाचा मृत्यू

(Last Updated On: November 19, 2020)

नागपूर : रिंगरोडवरील आशीर्वादनगरमध्ये युवकावर गोळीबाराची ( firing in nagpur )  घटना घडली. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ही घटना बुधवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. सक्करदरा पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात काही तासातच दोन आरोपी ताब्यात घेतले. यात एक आशीर्वाद नगर आणि अन्य एक मोमिनपुरा भागातील आहे सहा लाख उधारीच्या पैशांवरून घटना घडल्याचे समजते.