माजी राज्यपाल मृदुला सिन्हा यांचे निधन

राजधानी मुंबई राष्ट्रीय

नवी दिल्ली : गोव्याच्या पहिला महिला राज्यपाल मृदुला सिन्हा यांचे आज निधन झाले. त्यांनी राजकारणासह वाड्.मयीन क्षेत्रातही मोठे कार्य केले आहे. शिक्षिका ते लेखिका आणि गोव्याच्या राज्यपालपदापर्यंत पोहोचलेल्या मृदुला सिन्हा  (MRUDULA SINHA) यांनी लोकसेवाही मोठे महत्त्व दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आदींनी त्यांच्या निधनाबद्दल दु :ख व्यक्त केले.
राज्यपाल कोश्यारी यांना दु:ख
मुंबई : महाराष्ट्र व गोव्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गोव्याच्या माजी राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.
श्रीमती मृदुला सिन्हा एक कवी मनाच्या लेखिका व समाजसेविका होत्या. आपल्या राज्यपाल पदाच्या कार्यकाळात त्यांनी सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांना चालना दिली. आपुलकीच्या वागण्यामुळे मृदुला सिन्हा यांनी जनमानसात आपला वेगळा ठसा निर्माण केला. मृदुला सिन्हा यांच्या स्मृतीला मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. तसेच, आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना कळवितो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी संदेशामध्ये म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *