मुंबई

शंभर युनिटपर्यंत वीज माफीबाबत अभ्यास गट

(Last Updated On: November 21, 2020)

मुंबई : शंभर युनिटपर्यंत वीज माफ करण्यासाठी अभ्यास गट तयार करण्यात आला असून, कोरोना महामारीचे संकट दूर झाल्यावर याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. या समितीने अहवाल सादर करावा, असे समितीला सांगण्यात आले आहे. यासाठी वार्षिक सहा हजार कोटी खर्च येण्याचा अंदाज आहे, असेही त्यांनी सांगितले.
कोरोना महामारीच्या टाळेबंदी काळात अधिकचे वीज बिल प्राप्त असलेल्यांनी मीटररिडींग कार्यालयात किंवा संकेतस्थळावर पडताळणी करून घ्यावी. पडताळणी करून त्यावर कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री राऊत यांनी दिली.
प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता यांनी या धोरणाअंतर्गत लघुदाब, उच्चदाब व सौर यंत्रणेद्वारे नवीन वीजजोडण्यांना गती देत कृषिपंपांना दिवसा आठ तास वीजपुरवठा देण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे. असे सांगितले. वीजखांबापासून 200 मीटरपर्यंत लघुदाब, 200 ते 600 मीटरपर्यंत उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे तर 600 मीटरपेक्षा अधिक अंतरावरील कृषीपंपाची वीजजोडणी सौर कृषिपंपाद्वारे देण्यात येणार आहे. नवीन पंपांना वीज खांबापासून सर्व्हिस वायरद्वारे 30 मीटरपर्यंत एका महिन्यात तर 200 मीटरपर्यंत एरिअल बंच लघुदाब वीज वाहिनीद्वारे तीन महिन्यांत महावितरणच्या खर्चाने वीजजोडणी देण्यात येईल. यासोबतच शासन अनुदानातून उच्चदाब वितरण प्रणाली व सौर कृषिपंपाच्या वीजजोडण्या एका वर्षाच्या आत देण्यात येतील, असेही असिम गुप्ता यांनी सांगितले.