BREAKING NEWS

हास्य कलाकार भारती सिंह अटकेत

(Last Updated On: November 21, 2020)

मुंबई : मादक पदार्थ प्रतिबंधक विभागाने (एनसीबी) गांजाचे सेवन करत असल्यावरून हास्य कलाकार भारती सिंग हिला अटक केली आहे. विशेष म्हणजे तिने आपला गुन्हा कबूल केला आहे. तसेच तिचा नवरा हर्ष याचीही चौकशी सुरू आहे.
माहितीनुसार, मादक पदार्थांचा व्यवसाय करणाºया दलालांकडून गुप्त माहिती मिळाल्यानंतर एनसीबीने भारती सिंहच्या घरी धाड टाकली होती. पती-पत्नी दोघांवरही गांजा सेवन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, आतापर्यंतच्या कारवाईत हिंदी चित्रपट-मालिका क्षेत्रातील अनेक लहान- मोठ्या कलाकारांचे नाव समोर आले आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू ही बाब प्रकर्षाने उघडकीस आली आहे.