Home उपराजधानी नागपूर राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस

राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस

61

नागपूर : मागील वर्षभरापासून पावसाने पिच्छा सोडला नसलेला दिसून येत आहे़
पावसाचे दिवस असो, हिवाळा असो वा उन्हाळा तो पडतोच आहे आणि नुकसानही करतच आहे़ यात प्रामुख्याने शेतकरीबांधवांचे मोठी हानी होत असल्याचे दिसून येते़ दरम्यान, गुरुवारी रात्रीपासून ढगांनी पुन्हा आभाळात गर्दी केली आणि बरसला सुद्धा!
नागपुरात गुरुवारी रात्री अचानक पावसाला सुरुवात झाली. शहराच्या अनेक भागात तो कोसळला. अमरावती शहर, बडनेरा आणि ग्रामीण भागात वादळी वाºयासह अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे खरीप हंगामातील कापूस आणि तुरीला मोठा फटका बसल्याची माहिती आहे. कापूस भिजल्याने त्याच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती असते. याशिवाय वर्धा शहर आणि जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. हवामान बदलामुळे वाशिम जिल्ह्यात हरभरा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात येवला, निफाडमध्ये अवकाळी पाऊस बरसला आहे. त्यामुळे मुख्यत्वे कांदा पीक धोक्यात आले आहे़ कांद्यावर करपा आणि मावा रोगाची लागण झाली असून द्राक्ष बागांनाही फटका बसला आहे.
दरम्यान, आजही यवतमाळ जिल्ह्यातील पुसद परिसरात वादळी पाऊस पडल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here