Home राष्ट्रीय ‘ते’ दहशतवादी सुरुंगातून भारतीय सीमेत

‘ते’ दहशतवादी सुरुंगातून भारतीय सीमेत

96

श्रीनगर : नगरोटा चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांनी पाकिस्तानातून भारतात घुसण्यासाठी बोगदा वा सुरुंगाचा वापर केला असल्याचा खुलासा सुरक्षा यंत्रणांनी आणखी एक मोठा खुलासा केला आहे.
एबीपीने दिलेल्या वृत्तानुसार, ठार झालेले चारही दहशतवादी बोगद्यातून पाकिस्तानच्या शकरगड येथून सांबा सेक्टरमध्ये ( samba sector ) भारतीय सीमेत घुसले. ते ट्रकमधून प्रवास करत असताना पोलिसांनी टोल प्लाझाजवळ वाहन थांबवले आणि त्यानंतर झालेल्या चकमकीत ठार झाले. यावेळी 11 एके 47 रायफल्स आणि पिस्तुलही जप्त करण्यात आले. ही शस्त्रे आणि बारूद पूर्वीपासून ट्रकमध्ये असल्याचा संशय व्यक्त होत आहे. दरम्यान, सीमेवर असलेल्या ताराच्या कुंपणाला कोणतीही छेडछाड झाली नसल्याचा दावा सुरक्षा यंत्रणांनी केला आहे.