Home राजधानी मुंबई हास्य कलाकार भारती सिंह हिला पतीसह न्यायालयीन कोठडी

हास्य कलाकार भारती सिंह हिला पतीसह न्यायालयीन कोठडी

68

मुंबई : हास्य कलाकार भारती सिंह हिला पतीसह 4 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मादक पदार्थ प्रतिबंधक विभागाने ( narcotics branch ) गांजाचे सेवन करत असल्यावरून हास्य कलाकार भारती हिला प्रथम काल शनिवारी अटक केली. त्यानंतर तिचा पती हर्ष लिम्बाचिया यालाही अटक करण्यात आली. भारती आणि हर्ष यांच्यावर गांजा सेवनाचा आरोप आहे. या दोघांना एनडीपीएस कायद्याच्या कलम २७ अंतर्गत ताब्यात घेतल्यानंतर किल्ला कोर्टात दोघांना हजर करण्यात आले. ड्रग्जच्या पेडलर्सकडून गुप्त माहिती मिळाल्यानंतर टीव्ही अभिनेत्री आणि कॉमेडियनच्या भारती सिंहच्या घरी एनसीबीने धाड टाकली होती. दरम्यान, आतापर्यंतच्या कारवाईत हिंदी चित्रपट-मालिका क्षेत्रातील अनेक लहान- मोठ्या कलाकारांचे नाव समोर आले आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू ही बाब प्रकर्षाने उघडकीस आली आहे.