मुंबई

मुख्यमंत्री ठाकरे यांचा आज जनतेशी संवाद

(Last Updated On: November 22, 2020)

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रविवारी रात्री 8 वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. सध्या भेडसावत असलेल्या विविध समस्या- प्रश्न आणि कोरोना महामारीची दुसºयांदा पसरण्याची भीती याबाबत मुख्यमंत्री ठाकरे ( chief minister udhhav thakare) याबाबत काय माहिती देतात याकडे ही लक्ष असेल.
मागील काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून आले आहे. राज्यभरात त्या बाबत चर्चा सुरू आहेत. सरकारपातळीवरून मात्र यासंबंधी कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही़ याशिवाय लॉकडाऊन दरम्यान नागरिकांना आलेल्या वाढीव वीज बिलांबाबत लोकांच्या मनात तीव्र संताप आहे. विरोधी पक्षानेही सरकारवर टीका चालवली आहे़ अशात महाराष्ट्र नवनिर्माण सेनाकडून येत्या 26 नोव्हेंबरला राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.