पुन्हा कोरोना लॉकडाऊन होणार का, सर्वसामान्यांचा प्रश्न

उपराजधानी नागपूर

नागपूर : राज्यात पुन्हा कोरोनाची ( covid-19 ) दुसरी लाट येणार, अशी भीती वर्तवली जात असून लॉकडाऊन (टाळेबंदी) लागणार का? अशी विचारणा सर्वसामान्यांकडून होत आहे.
मागील काही दिवसांपासून नवी दिल्लीत कोरोना अर्थात कोविड-19 ची दुसरी लाट येणार असून, लॉकडाऊनसारखी स्थिती निर्माण झाली आहे़याशिवय गुजरातेत अहमदाबादमध्ये रात्रीचे लॉकडाऊन सुरू करण्यात आले आहे. दुसरीकडे महाराष्ट्र सरकारनेही दिल्लीतून होणारी विमानसेवा आणि रेल्वे वाहतूक थांबवणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातही पुन्हा तीच स्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाल्याने सर्वसामान्यात भीती तयार होणे साहजिकच आहे़ कारण मागील मार्च महिन्यांपासून देशातील, राज्यातील प्रत्येकाने भयाण स्थिती अनुभवली आहे़ अनेकांचे सगेसोयरे मृत्यू पावले आहेत़ नोकरदार, लहान मोठे व्यावसायिक, कारखानदार, रोजमजुरीदार यांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे़आता कुठे स्थिर स्थावर होत असताना पुन्हा एकदा संकट आ वासून उभे ठाकण्याच्या तयारीत आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाच्या दुसºया लाटेची शक्यता नाकारली नाही. पुण्यात पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित मेळाव्यानंतर पत्रकारांना त्यांनी कोरोनाच्या परिस्थितीबद्दल माहिती दिली. आणखी 10 ते 15 दिवस राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. (छायाचित्र : मागील जनता कर्फ्यूदिनी नागपुरात अशी स्थिती होती.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *