नागपूर

लोकांनीच नियम पाळावेत,कोरोनासंबंधी मुख्यमंत्र्यांचे आवाहन

(Last Updated On: November 22, 2020)

CM UDHHAV THAKARE SPEECH ON CORONA : राज्यात पुन्हा लॉकडाऊनची वेळ येऊ नये. कोरोनाचा अटकाव करण्यासाठी लोकांनीच नियम पाळावेत, निष्काळजीपणा करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
मुख्यमंत्र्यांनी रविवारी रात्री आठच्या सुमारास राज्यातील जनतेसोबत संवाद साधला. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात नागरिकांनी खूप सहकार्य केले, याबद्दल आभार मानत असतानाच दिवाळीनंतर कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत असल्याची चिंता व्यक्त केली.
रुग्ण संख्या आटोक्यात असली तरी धोका टळलेला नाही, असे सांगत कोरोनाची दुसरी लाट ही कदाचित त्सुनामी असेल, असा इशाराही त्यांनी दिला.

मुख्यमंत्र्यांच्या सूचना
* मास्क वापरा
* वारंवार हात धुवा
* शारीरिक दूरतेचे (सोशल डिस्टन्सिंग) पालन करा

अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. आपल्या देशात काही राज्यांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शाळा सुरू करण्याबाबत अद्याप काही ठरवलेले नाही. मंदिरं उघडली असली तरी तिथे गर्दी करू नका. अनावश्यक नसेल तिथे जाऊ नका, अशा सूचना करत लक्षणे दिसून आल्यास लगेच चाचणी करून घ्या, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
याशिवाय त्यांनी राज्यातील आरोग्य कर्मचाºयांनी राबवलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहिमेची त्यांनी कौतुक केले.

ते म्हणाले की, मला राजकारण करायचे नाही. पण कोरोना वाढला तर हे उघडा ते उघडावाले या परिस्थितीची जबाबदारी घेणार का? असा सवाल करून मुख्यमंत्री म्हणाले की, पाडव्यापासून आपण प्रार्थनास्थळे देखील उघडली आहेत पण गर्दी करून आपला आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नका. आजपासून ४ दिवसांनी मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याला १२ वर्षे पूर्ण होतील. शूरवीर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसेच कमांडोज यांनी प्राणपणाने अतिरेक्यांशी सामना केला. आजही आपण काही महिन्यांपासून या कोविड नावाच्या छुप्या दहशतवाद्याशी कडवा मुकाबला करतो आहोत, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आपले सण, उत्सव थांबलेले नाहीत. उत्तर भारतीयांची छट पूजा झाली. चार दिवसांवर कार्तिकी एकादशी आली आहे. आषाढीला जसे आपण सर्वांनी सहकार्य केले होते तसे कार्तिकीला देखील करावे, असे विनम्र आवाहन मी वारकरी बंधू भगिनींना करतो आहे. यंदा दस?्याला शिवसेनेचा मेळावा देखील शिवतीर्थावर मोठेपणाने साजरा न करता साधेपणाने केला, मी आपला मुख्यमंत्री आहे त्यामुळे ह्यलोका सांगे ब्रह्मज्ञानङ्घह्ण असे असू नये म्हणून नियम माज्यापासून काटेकोरपणे पाळले नाही तर तुम्हाला काही सांगायचा अधिकार नाही. दिवाळीत फटाके वाजवू नका असे मी सांगितले आणि आपण माझे ऐकले आणि यंदा खूप कमी फटके उडाले. प्रत्येक गोष्टींसाठी कायदे करण्याची गरज नाही असेही ते म्हणाले.

पुन्हा कोरोना लॉकडाऊन होणार का, सर्वसामान्यांचा प्रश्न