भारती सिंह हिला जामीन मंजूर

राजधानी मुंबई

मुंबई : हास्य कलाकार भारती सिंह हिला पती हर्ष लिम्बाचियासह जामीन मंजूर झाला आहे. 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाने जामिनास मान्यता दिली. घरात मादक पदार्थ (गांजा) सापडल्याप्रकरणी दोघांना मादक पदार्थ प्रतिबंधक विभागाने (एनसीबी) अटक केली होती.
आरोपींकडे सापडलेला गांजा हा कमी प्रमाणात होता. तो वैयक्तिक सेवनासाठी होता. तसेच, त्याचा व्यावसायिक वापर केला नव्हता, असे मत न्यायालयाने कालच व्यक्त केले होते. शिवाय हर्षची एनसीबी कोठडी नाकारत दोघांचीही रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती. हा जामीन अर्ज कालच सादर करण्यात आला होता. तर, तपास यंत्रणांना यावर उत्तर देण्यासाठी एक दिवसाचा अवधीदेण्यात आला होता. शिवाय सरकारी वकील काही कारणांमुळे हजर राहू शकले नाहीत. त्यामुळे अखेर दोघांची १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला़ तसेच, त्यांना ‘एनसीबी’ला पुढील तपासात सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, भारती सिंह हिला गांजाचे सेवन करत असल्यावरून प्रथम शनिवारी अटक केली होती. त्यानंतर पती हर्ष लिम्बाचिया यालाही अटक करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *