मुंबईकर : तुम्ही उकडत असल्यास काय करता ?
पुणेरीकर: आम्ही कूलरसमोर बसतो!
मुंबईकर: तरीही उकडत असेल तर…
पुणेकर : मग आम्ही कूलर चालू करतो…
***
भिकारी : तुमच्या शेजारणीने पोट भरून खाऊ घातले, तुम्ही सुद्धा काहीतरी खाऊ घाला !
रमाकाकू : हे घे …हाजमोला.
.
.
.
भिकारी : साहेब, एखादा रुपया तरी द्या .
साहेब : उद्या ये.
.
.
.
भिकारी: च्यायला, उद्या उद्या म्हणता, या कॉलनीत माझे हजारो रुपये अडकलेत!
***
पक्या : शेरू, कानात बाळी केव्हापासून घालायला लागलास?
शेरू : बायको माहेरी जाऊन आल्यापासून…
पक्या : वहिनींनी आणली का माहेरावरून ?
शेरू : ती कसली आणते! ही बाळी तिला माझ्या अंथरुणात सापडली. ती माझीच आहे, असं सांगितलं तिला. मग काय तेव्हापासून कानात डुलतेय…
***
वडिलांनी मन्याच्या कपड्याची तलाशी घेतली़.
काही पोरीचे फोन नंबर्स मिळाले.
मग काय,बापानं शिंच्याला चांगलं बदडून काढलं.
…केव्हापासून सुरू हे सर्व?
हुंदके देत मन्या केकाटला, पप्पा ही पँट माझी नाही, तुमची आहे़.
मग क्काय बापाची हवा फ्फुस्स !! मन्याला सोडलं अन् आपल्याच अंगावरचे कपडे टर्रार्रा फाडले.
*****