Home उपराजधानी नागपूर सदर वाहतूक परिमंडळातील बेवारस वाहनाबाबत…

सदर वाहतूक परिमंडळातील बेवारस वाहनाबाबत…

44

 

नागपूर : वाहतूक परिमंडळ सदर हद्दीत सन 2018 ते आजपर्यंत मिळालेले बेवारस दुचाकी स्कुटर, मोटर सायकल, आॅटो आदी जमा असून संबंधित वाहन मालकांनी योग्य त्या
कागदपत्रांची पूर्तता करून वाहने आपल्या ताब्यात घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा
नियोजित मुदतीनंतर सदर वाहनांचा लिलाव करण्यात येईल, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगवन्ेद्रसिंग राजपूत यांनी म्हटले आहे.
माहितीनुसार, सदर वाहतूक परिमंडळाच्या हद्दीत गेल्या काही वर्षांत बेवारस असलेल्या अनेक
मोटर सायकल आदी वाहने वाहतूक परिमंडळ आवारात खराब होउन मूल्यहीन होत चालले आहेत. त्यामुळे या वाहनांशी संबंधित मालकांनी योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करून आपल्या ताब्यात घ्यावे. येत्या सात
दिवसांमध्ये जे मालक आपल्या वाहना संदर्भात योग्य कागदपत्रांसह संपर्क करतील ती वाहने सोडून इतर वाहनांचा लिलाव काढण्यात येईल. मोटर
सायकल आदी वाहनांचे क्रमांक, चेसिस नंबर, इंजिन नंबर व वाहनाचा प्रकार आदी
माहिती वाहतूक परिमंडळ सदर नागपूर शहर ( nagpur police ) येथे उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here