सक्करदरा पोलिसांतर्फे मोठी कारवाई

उपराजधानी नागपूर

नागपूर : सक्करदरा पोलिसांनी ( sakkardara police ) शनिवारी रात्री गस्त मोहिमेदरम्यान आणि आज आशीर्वादनगर भागातील एनआयटी मार्केट येथून एका आरोपीकडून तीन अग्निशस्त्र ताब्यात घेतली आहेत.
माहितीनुसार, 21 नोव्हेंबर 2020 च्या रात्री दहा वाजताच्या दरम्यान फिर्यादी पोहवा राजेंद्र्र यादव पेट्रोलिंगदरम्यान खबºयाकडून शेख नदीम उर्फ गोल्डन राजा हा आपल्या ताब्यात अग्निशस्त्र बाळगून असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यावरून सक्करदरा पोलिसांचे पथक घटनास्थळी गेले असता एकजण पोलिसांना पाहून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला ताब्यात घेण्यात आले़ यावेळी पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टमध्ये देशी बनावटीचे अग्निशस्त्र मिळून आले. चौकशीतील माहितीवरून त्याच्या घरातून आणखी अग्निशस्त्र जप्त केले. यानंतर आरोपी
शेख नदीम उर्फ राजा गोल्डन वल्द शेख नाजीम (वय 23 वर्षे) विरुद्ध भारतीय
हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान आरोपीकडून आज
(23 नोव्हेंबर 2020) आणखी एक पिवळ्या रंगाचे अग्निशस्त्र जप्त केले.
सदरची कारवाई परिमंडळ क्रमांक चारचे उपायुक्त अक्षय शिंदे, सहाय्यक पोलिसआयुक्त विजय मराठे, वपोनि सत्यवान माने, दुपोनि यादव यांच्या मार्गदर्शनात सपोनि आर.ए. बस्तवाडे, पोउपनि संतोष इंगळे, पोहवा राजेंद्र यादव, पोशि गोविंद, रोहण, निलेश, पवन, मपोशि आरती यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *