Home राष्ट्रीय आजची पेट्रोल दरवाढ किती…

आजची पेट्रोल दरवाढ किती…

66

Today Petrol Cost : सार्वजनिक क्षेत्रातील इंधन तेल कंपन्यांकडून सोमवारी पेट्रोल व डिझेल दरात वाढ करण्यात आली. ही सलग चौथ्या दिवशी झालेली वाढ असून पेट्रोलच्या दरात 7 पैशांची तर डिझेलच्या दरात 18 पैशांची वाढ झाली आहे.

ताज्या दरवाढीनंतर दिल्लीमध्ये पेट्रोलचे प्रतिलिटरचे दर 81.53 रुपये, तर डिझेलचे दर 71.25 रुपयांवर गेले आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 88.23 रुपयांवर तर कोलकातामध्ये हे दर 83.43 रुपयांवर गेले आहेत. चेन्नई, नोएडा, रांची आणि लखनौमध्ये हेच दर अनुक्रमे 84.53, 82.00, 81.12 व 81.92 रुपयांवर पोहोचले. मुंबईत डिझेलचे दर 77.73 रुपये असून कोलकाता येथे 74.82 रुपयांपर्यंत पोहाचले आहेत. चेन्नईमध्ये प्रतिलिटर डिझेलचा दर 76.72 रुपये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here