Home मुंबई सरकारतर्फे कोरोनासंबंधी नवी नियमावली घोषित

सरकारतर्फे कोरोनासंबंधी नवी नियमावली घोषित

42

मुंबई : राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने राज्य सरकार पुन्हा एकदा प्रवासाबाबतचे नियम कठोर केले आहेत.
दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोवा राज्यातून महाराष्ट्रात हवाई, रेल्वे व रस्ते मार्गाने येणाºया प्रवाशांना कोविड आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल आपल्यासोबत बाळगण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात येण्याच्या 72 तास आधी कोरोनासंबंधी तपासणी चाचणी करावी लागेल. अशा प्रवाशांकडे आरटी-पीसीआर रिपोर्ट नसेल, त्यांना विमानतळावर स्वखर्चाने चाचणी करणे बंधनकारक आहे.

लोकांनीच नियम पाळावेत,कोरोनासंबंधी मुख्यमंत्र्यांचे आवाहन

पुन्हा कोरोना लॉकडाऊन होणार का, सर्वसामान्यांचा प्रश्न

राज्यात दाखल झालेल्या कुण्या प्रवाशांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास त्यांच्याशी संपर्क साधून आधीपासून अस्तित्वात असलेल्या नियमांनुसार (प्रोटोकॉल) उपचार केले जातील.
दरम्यान, चाचणी निगेटिव्ह ( corona negative ) असल्यास संबंधिताला घरी जाण्यास परवानगी असेल. संपर्क क्रमांक, पत्त्यासह सर्व माहिती घेतली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, पुढील 15 दिवसांत कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्यास सरकार लॉकडाऊनसारखा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here