Home रानशिवार अंतर-बाह्य शांती…SAAY pasaaydan

अंतर-बाह्य शांती…SAAY pasaaydan

93
rajindar singhji

संत राजिन्दर सिंहजी महाराज

आज समस्त विश्वातील लोक शांती प्राप्त करण्याच्या प्रयत्नांत लागले आहे. विविध देश सतत आपापसांत चर्चा करत आहेत, जेणेकरून शांती कायम राहील. शांतीच्या शोधात विश्वस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. आश्चर्याची गोष्ट आहे की अनेक लोक शांतीच्या शोधाच्या प्रदीर्घ प्रयत्नांनंतरही तिची सत्यता त्यांना क्षणभंगुरच वाटते. या भूमंडळावर असे काही वाटत नाही की ज्यामुळे आपल्याला खरी शाश्वत शांती प्राप्त होऊ शकेल.

मानवी जीवन आणि दु:ख हे एकमेकांबरोबरच चालत असतात. भले कोणी श्रीमंत असो किंवा गरीब, राजा असो किंवा शेतकरी, सर्वांचे जीवन कोणत्या ना कोणत्या समस्येने घेरलेले असते. कोणत्याही व्यक्तीचे जीवन अपघात, दुर्घटना किंवा आजारपणा शिवाय व्यतीत होत नाही. आपल्या डोक्यावर मृत्यूची तलवार सदैव लटकत असते. त्यामुळे आपण आपले जीवन शांततेत जगू शकत नाही. कुटुंबातील एखादा सदस्य आजारी पडल्यावर कुटुंबातील सर्व सदस्य दुखी होतात. अशाच प्रकारे घरात आणि घराबाहेर आपले कोणाशी ना कोणाशी तरी भांडण अथवा तणाव हा होतच असतो. जीवनामध्ये अशीही वेळ निश्चित येते जेव्हा आपल्याला सुखाचा अनुभव होतो; परंतु ते सुख क्षणभंगुरच असते. म्हणूनच आपल्याला अस वाटू लागते की जीवनामध्ये शांती प्राप्त करणे अशक्य आहे; परंतु हे ही खरे आहे की खरी शांती आपण याच जीवनामध्ये प्राप्त करू शकतो. आपण आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायचा आहे. जीवनात चढ-उतार आपल्याला सहन करावे लागतील. सर्वसाधारणपणे आपण शांतीचा शोध बाहेरील जगतात करतो. आपण भौतिक साधनांमध्ये, सामाजिक मान-सन्मान आणि नाती-गोती यांच्यातच शांतीचा शोध घेत असतो; परंतु यातील कुठलीही गोष्ट नाहीशी झाली अथवा आपल्यापासून दूर गेली तर आपण भावविभोर होऊन जातो, फार घाबरून जातो आणि आपल्या मनाची शांती भंग पावते.

खरी शांती आपल्या अंतरात विद्यमान आहे. ध्यान धारणा केल्याने आपण आपल्या अंतरातील परमेश्वराच्या दिव्य ज्योती आणि श्रुतिशी जोडले जातो. असे केल्याने आपल्या आत्म्याला सुखाचा व परम आनंदाचा अनुभव होतो. हे परम सुख आत्म्याच्या बरोबर कायम राहते. आंतरिक शांतीचा अनुभव केल्यावर आपण बाहेरील शांती प्राप्त करू शकतो. आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांबरोबर शांतीने आणि प्रेमाने वागू लागतो. त्यामुळे आपल्या अंतरातील शांती इतरांपर्यंत पोहोचते. आंतरिक आणि बाहेरील जीवनामध्ये आपण प्रफुल्लित होऊन एक परिपूर्ण मनुष्य बनतो.

आपण संसारातील परिस्थिती बदलू नाही, ना त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या समस्या नष्ट करू शकत नाही. मात्र, ध्यान केल्यामुळे या समस्यांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलू शकतो. ध्यान अभ्यासाद्वारा आपण शांतीपूर्ण जीवन जगू शकतो. कारण की याचे सत्य आपण जाणून घेतले आहे, याच ज्ञानामुळे आपण जीवनातील समस्यांना पूर्ण सामर्थ्याने तोंड देऊ शकतो. असे केल्याने आपण आपल्या सभोवतालच्या लोकांसाठी हिम्मत आणि शांतीचे प्रेरणास्तोत्र बनू शकतो.

*****